30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये अंत्यसंस्कारासाठी माणसांचीच वानवा

औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कारासाठी माणसांचीच वानवा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या देशभरात सर्वात जास्त प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील सर्वाधिक वेगाने कोरोना संसर्ग वाढणा-या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रतील ९ जिल्हे आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड या दोन जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. सध्या औरंगाबादमध्ये तर भयानक परिस्थिती आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याबरोबरच दररोजच्या मृतांची संख्याही खूप मोठी आहे. रोज भरपूर मृत्यू होत असल्याने सध्या तर औरंगाबादमध्ये मृतांच्या अंत्यसंस्कारांसाठीही माणसे मिळेनाशी झालेली आहेत.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात दररोज वेगाने कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामानाने आरोग्ययंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात तोकडी पडत आहे. परिणामी वेळेवर उपचार मिळत नसल्याने रोजचा मृत्यूंचा आकडाही जास्त आहे. प्रशासनातर्फे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रोजच सरासरी ३० मृतदेह येत असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसांचीच कमतरता पडत आहे. परिणामी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यास खूप वेळ लागत आहे.

मृतदेह पॅकिंग व अंत्यसंस्कारासाठी ८ तास
औरंगाबादमध्ये साधारण दर दिवशी सरासरी ३० कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या मृतदेहांचे पॅकिंग करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ७ ते ८ तासांचा वेळ खर्ची पडत आहे. पॅकिंग करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने घाटी प्रशासन हे काम करण्यासाठी लोकांचा शोध घेत आहे. औरंगाबादच्या घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांनी कंत्राटी तत्वावर मृतदेह पॅक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील केल्याचे सांगितले जात आहे.

अन्य संसर्गजन्य आजारांचीही भीती
जर असेच चालू राहिले तर मृतशरीरावरुन पसरणा-या अन्य संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढण्याची भीती डॉक्टर व जागरुक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लातुरात ६० टक्के रुग्ण गृह विलगीकरणात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या