औरंगाबाद : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चात पैसे देऊन गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. तर यासंदर्भात त्यांनी एक व्हीडीओ सुद्धा फेसबुकवर पोस्ट केला आहे.
यावर बोलताना दानवे म्हणाले की, भाजपकडून काढण्यात आलेला मोर्चा शहरासाठी होता, पण यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलवण्यात आले. एवढेच नाही तर पैसे देऊन लोक मोर्चात आणले गेले होते. कारण शहरातील लोकांचा
या मोर्चाला पाठिंबा नव्हता आणि भाजप खोटे बोलत असल्याचे त्यांना माहीत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून ज्यात महिलांना पैसे देऊन मोर्चासाठी बोलवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.