पैठण । जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून 3 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 98 टक्के कायम असुन, धरणात 7 हजार घनफुट प्रतितास या वेगाने वरच्या धरणाचे पाणी दाखल होत आहे. धरणाचा विसर्ग बघण्यासाठी पर्यटकांनी धरण परिसरात गर्दी करू नये. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धरणात पाण्याची आवक लक्षात घेता जायकवाडी पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारी दोन सांडवे वर करून गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू केला होता.
त्यानंतर सांयकाळी पुन्हा दोन सांडवे उचलण्यात आले. या दोन्ही सांडव्यातून एकुण 2 हजार 100 आणि जायकवाडी जल विद्युत केंद्रातुन 1 हजार 600 असा एकुण 3 हजार 700 क्युसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने, गोदावरी काठोकाठ भरून वाहत आहे. गोदावरी नदी काठावरील ग्रामस्थांनी गोदावरी पात्रात जाऊ नये असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
२० कोटींच बक्षिस : संयुक्त अरब अमिरातीत राहणारे गुरुप्रित सिंह कोट्यधीश झाले