34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeऔरंगाबादजायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची शक्यता : वरुणराजाने दाखवली कृपा

जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची शक्यता : वरुणराजाने दाखवली कृपा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद, 18 ऑगस्ट : कायम दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडी यंदाही 100 टक्के भरण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे नाशिकहुन पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आता जायकवाडी धरणाला मिळाले आहे. जायकवाडी धरणात 67 टक्के पाणीसाठा आहे. नाशिकहून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात पोहचले आहे.

20 हजार क्युसेक ने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या चार दिवसांमध्ये जायकवाडी धरणात 10 TMC इतके पाणी आहे. जर पुढील काही दिवस हे पाण्याची आवाक अशीच सुरू राहिली तर यंदा जायकवाडी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण भरणे ही मराठवाड्यासाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे.

तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणही लवकरच काटोकाट भरणार आहे. भंडारदरा धरण हे आता 96 टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातून 4399 क्युसेक इतका निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. त्यानंतर हे पाणी प्रवरा नदी मार्गे जायकवाडीत मिळणार आहे.त्यामुळे यंदाही जायकवाडी धरण भरणार असल्यामुळे मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील वर्षी सुद्धा मराठवाड्यात कमी पाऊस होता. पण, नाशिकहुन पाण्याची आवाक वाढल्यामुळे जायकवाडी धरण यंदाही भरणार अशी चिन्ह आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या