32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeऔरंगाबादउद्या औरंगाबाद लॉकडाउनचा निर्णय

उद्या औरंगाबाद लॉकडाउनचा निर्णय

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद: शहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता, सोमवारी लॉक डाऊन लागणार नसल्याचे समोर आले. रविवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी जिल्हा टास्क फोर्सची बैठक आयोजित केली. त्यात सर्व बाबींवर चर्चा करुनच निर्णय होणार आहे. लॉक डाऊन लागणार असल्याचे निश्चित असले तरी, तो पुढील आठवड्यात लागणार असल्याचे समोर आले.
गेल्या तीन आठड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याावर निर्बंध घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे नागरिकांनी नियमांचे पालन केले नसल्याने लॉक डाऊनची नामुष्की ओढवण्याची वेळ आल्याचे सुत्रांनी सांगितले. शनिवारी सकाळपासून शहरात सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होती. तसेच काही माध्यमांमध्येही त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. तसेच काहींनी तर बाजारात आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीही केली होती. पुढील आठवड्यात लॉक डाऊन लागणार आहे. नागरिकांची मानसिकता तयार करण्यासाठी हा प्रयत्न केला. मात्र काहींनी थेट सोमवारी लागणार असल्याचे चित्र निर्माण केल्याने शहरात नागरिक धास्तावले. शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉक डाऊन लावणेसदृश्य स्थिती आहे. मात्र यावर टास्क् फोर्स मध्ये अगोदर चर्चा होईल.असे मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटले आहे़

 

घाटंग्री शिवारात बिबट्याचा मृत्यू, शवविच्छेदनानंतर समजेल मृत्यूचे नेमके कारण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या