29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत लॉकडाऊन !

औरंगाबादेत लॉकडाऊन !

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबादेत कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यानंतर ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अंशत: लॉकडाऊन लागू केला होता. मात्र तरीही बाजारपेठांमध्ये लोकांची झुंबड कमी होत नव्हती. परिणामी अंशत: लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत वाढ सुरुच होती. त्यामुळे प्रशासनाने ३० मार्चपासून संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अंशत: लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही
औरंगाबादेत येत्या १५5 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकारÞ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कोणतीही कमी झाली नाही. त्यानंतर आता संपूर्ण लॉकडाऊनचा येथील प्रशासनाने निर्णय घेतला.

इस्त्रोच्या आगामी मोहिमा हरित इंधनावर होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या