32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeऔरंगाबादरुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन निश्चित: देसाई

रुग्णसंख्या वाढल्यास लॉकडाऊन निश्चित: देसाई

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : ‘लॉकडाऊन ही कुणाच्याही आवडीची इच्छा नाही. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकार पुढे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्कआणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेणेकरून रुग्ण संख्या आटोक्यात राहील व लॉकडाऊनची वेळ येणार नाही. औरंगाबाद शहराचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी लॉकडाऊनविषयी सूचक वक्तव्य केले. शहरातील प्रियदर्शिनी उद्यानातील प्रस्तावित स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाला शुक्रवार दि.२६ भेट देऊन पाहणी केली.

कोरोना रुग्ण वाढ कायम
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा, सांगली कोल्हापूर,आणि सोलापूर पाचही जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ कायम असून पुणे जिल्ह्यात हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे़पाचही जिल्ह्यात काल दिवसभरात १ हजार ८१५ रुग्ण वाढले असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात १ हजार ५४२ , सातारा जिल्ह्यात ११३ , सोलापूर जिल्ह्यात ९७ सांगली जिल्ह्यात १२ तर कोल्हापूर जिल्ह्यात ५१ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.त्याचप्रमाणे बरे होणाºया रुग्णांची एकूण संख्या १ हजार २०२ आहे. पुणे जिल्ह्यामध्ये १ हजार ३३, सातारा जिल्ह्यामध्ये ८३ , सोलापूर जिल्ह्यामध्ये ६३ सांगली जिल्ह्यामध्ये ८ व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १५ रुग्णांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आजवर ५ लाख ८६ हजार १२४ रुग्ण बरे झाले असून रुग्णांची संख्या ६ लाख १३ हजार २२७ झाली आहे. तर प्रत्यक्ष रुग्ण संख्या १० हजार ८०८ इतकी आहे. आजवर एकुण १६ हजार २९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २. ६६ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण ४ लाख ३ हजार ४९७ रुग्णांपैकी ३ लाख ८५ हजार ६९३ रुग्ण बरे झाले आहेत प्रत्यक्ष रुग्ण ८ हजार ६८२ आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या