24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeऔरंगाबाद१७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा

१७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती दिनाचे निमित्ताने दिनांक १७ व १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे सकाळी ९:३० वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. याचप्रमाणे या मेळावा ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी मा.मंगल प्रभात लोढा, मंत्री, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालविकास विभाग यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महारोजगार मेळाव्यामध्ये बजाज ऑटो लि., एनआरबी बेअरींग प्रा.लि.,फोर्ब्स ॲन्ड कंपनी लि., अजंता फार्मा लि., पॅरासन मशिनरी इंडिया प्रा.लि., अजित सीड्स प्रा. लि., न्युट्रीविडा न्युट्रास्युटिकल्स, नवभारत फर्टीलायजर, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि., लुमीनाज सेफ्टी ग्लास प्रा.लि., लक्ष्मी मेटल प्रेसींग वर्क प्रा.लि., लक्ष्मी रिक्षा बॉडी पार्ट प्रा.लि., रत्नप्रभा कार्स प्रा.लि., मायलन लॅबॉरेटरीज, व्हेरॉक इंजिनीअरींग लि., पित्ती इंजिनीयरींग लि., ग्राइंड मास्टर मशीन इंडिया, प्रा.लि, गुडइयर साऊथ एसिया टायर्स प्रा. लि., पर्किन्स इंडिया प्रा.लि., इत्यादी औरंगाबाद जिल्हयातील नामांकित नियोक्त्यांनी इंजिनीअरींग पदवी, पॉलिटेक्नीक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर, दहावी ,बारावी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारणपणे २२८३ आणि अँप्रेंटिसशीपसाठी ३०२९ अशी एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑलनाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. मेळाव्यासाठी अधिसूचित पदांची माहिती दररोज अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये प्राप्त होणाऱ्या रिक्त पदांना संकेतस्थळावर दररोज लॉग-इन होऊन अप्लाय करावे आणि सकाळी ०९:३० वाजता कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल सैंदाणे,उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय औरंगाबाद व श्री.एस. आर.वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या