27.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत डेंग्यूने डोके काढले वर; कोरोनापेक्षा डेंग्यूचे अधिक रुग्ण

औरंगाबादेत डेंग्यूने डोके काढले वर; कोरोनापेक्षा डेंग्यूचे अधिक रुग्ण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट उसळली असून महाराष्ट्र शासनाकडून कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर डेल्टा प्लस संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लसपेक्षा डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहेत. गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल ५६ संशयित आढळून आले असून ९ जणांना डेंग्यूची बाधा झाली आहे.

कोरोना महामारीच्या तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना कोरोना तपासणीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ३२ बालकांची तपासणी करण्यात आली असून एकही बालक कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्याकडे कर्मचाº­यांची तपासणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल ५६ संशयित डेंग्यू रुग्ण आढळून आले. त्यांची तपासणी केली असता ९ जणांना डेंग्यू आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी मलेरिया विभागाच्या मदतीने धूर फवारणी, औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.

अराजकाच्या दिशेने…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या