28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeऔरंगाबादएनडीआरएफच्या धर्तीवर लम्पी आजारासंबंधी मदत

एनडीआरएफच्या धर्तीवर लम्पी आजारासंबंधी मदत

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : जनावरांच्या लम्पी आजारावर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतक-यांसाठी शिंदे सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यांसाठीदेखील निर्णय घेतला आहे. पावसामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे, त्यांना मदत करण्याचा जीआर काढण्यात आला आहे. गोगलगाईमुळे होणा-या शेतक-यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेतला आहे. तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचे उत्तर आजच्या या विराट सभेने दिलं आहे. आजच्या सभेला सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला शिवकवण दिलीय की जे होणार आहे तेच बोलायचं. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो. एकदा शब्द दिला की मी स्वत:चही ऐकत नाही.

लोक विरोधातून सत्तेकडे जातात. परंतु, आम्ही सत्तेकडून विरोधात गेलो. त्यावेळी अनेकजण आमचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. परंतु, 50 जण सोबत असलेले सगळे विश्वासू होते. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. आमचा निर्णय हा जगातील एक मोठा इतिहास आहे. अडीच वर्षांचा वनवास भोगला. परंतु, आता सगळे आमदार हा वनवास संपला असे म्हणत आहेत. अडीच वर्षे समाजात नकारात्मकता पसली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवून निर्णय घेतला आणि जनतेच्या मानातील सरकार स्थापन केलं. आज जनतेमध्ये उत्साह आहे, असे एनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवारांना टोला
यावेळी बोलत एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील टोला लगावला. अजित पवार हे सकाळी सहापासून लोकांची कामे करतात असे सांगितले जाते. परंतु, मी सकाळी सहा पर्यंत लोकांची कामे करतो असे म्हणत मुख्यमंर्त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या