25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत चारपटीने वाढ

औरंगाबादमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत चारपटीने वाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शहरात कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी शहरातील रुग्णालयांकडून ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या १ मार्चला १४.८२ टन ऑक्सिजनची मागणी होती ती आता ५४ टनांवर पोहोचली. मागणीत चार पटीने वाढ झाल्याने बफर स्टॉक केवळ एक दिवसाचा शिल्लक आहे. मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत कोरोना रुग्णांमध्ये गृह विलगीकरणात राहून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या मर्यादित होती. फेब्रुवारी २०२१ नंतर ही संख्याही वाढली आहे. त्यासह घरगुती ऑक्सिजन वापर करणा-या रुग्णांची संख्या वाढली.

त्यामुळे रुग्णालयांसह घरगुती ऑक्सिजन वापरासाठीच्या सिलिंडरची मागणी एका महिन्यातच चार पटीने वाढली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादमध्ये ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग पुरवठादारांकडे दोनशे ते अडिचशे सिलिंडरची मागणी असायची. हा आकडा नऊशे ते एक हजारच्या आसपास आहे. यामध्ये जम्बो सिलिंडरची संख्या अधिक आहे. रुग्णालयांसह घरगुती ऑक्सिजन वापर करणा-या रुग्णांसाठीही जम्बो सिलिंडरची मागणी वाढली आहे. घरगुती रुग्णांसाठी दीड किलोच्या सिलिंडरची मागणी कमी आहे. वाढती मागणी लक्षात घेत अधिकच्या सिलिंडरचा साठा वाढविण्याच्या सूचना औषधी विभागाने संबंधितांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या