24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeऔरंगाबादपंकजा मुंडेंच्या समर्थकांचा भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ला

पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ला

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. सकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पुन्हा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ल्याच्या प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली. काही वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये ही घटना घडली असून दोन कार्यकर्ते जे स्वत:ला पंकजा मुंडेचे समर्थक असल्याचे सांगत होते. त्यांनी यापूर्वी देखील भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याच कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या क्रांती चौकातील कार्यालयाकडे येत अचानक घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

पंकजा मुंडेंना हेतुपुरस्सर डावलले जात असल्याचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला. पण आधीच तिथे तयारीत असलेल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या समोर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची पोलिसांनी आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील होता. पण हे कार्यकर्ते गाडीतून उतरून थेट घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना ताब्यात घेऊन गेले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या