32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन

औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढायला लागला आहे. त्यातही मुंबई, पुणे या प्रमुख शहरांपाठोपाठ औरंगाबादमध्ये मोठ्यासंख्येने रुग्णवाढ होत आहे. लोकांमध्ये जागृती करुनही लोक काही ताळयावर येत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासाने कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

मागील दोन दिवसांपासून लॉकडाऊन लागू होण्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. शनिवारी झालेल्या बैठकीत उद्योजक व व्यापा-यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र रविवारी जिल्हाधिका-यांनी अंशत: लॉकडाऊनची घोषणा करुन सर्व चर्चा थांबवली आहे. दि. ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन असणार आहे. प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

अंशत: लॉकडाऊनच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, शाळा-महाविद्यालये संपूर्णपणे बंद असतील. विशेषकरून मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये होणा-या विवाह समारंभांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर, शनिवारी व रविवारी केवळ वैद्यकीय सेवा, माध्यम कार्यालय,दूध विक्री, भाजीपाला,फळविक्री सुरू असणार आहे.

…तर संपुर्ण लॉकडाऊन!
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी इशारा दिला की या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याशिवाय खासगी कंपन्यांमध्ये काम करणा-या सर्व कर्मचारी व अधिका-यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील सर्वांनी सोबत बाळगणे आवश्यक राहणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे.

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या