27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeऔरंगाबादपीएफआयचे राज्याध्यक्ष नदवींना औरंगाबादेत अटक

पीएफआयचे राज्याध्यक्ष नदवींना औरंगाबादेत अटक

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून ए. टी. एस. पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष शेख नासीर शेख साबेर उर्फ नदवी (३७) (रा. बायजीपुरा, औरंगाबाद) यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दहशतवादविरोधी पथकाने पीएफआय या संघटनेच्या शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजल सय्यद खालील, परवेज खान मुजमिल खान, अब्दुल हादी, अब्दुल रौफ अशा ४ जणांना अटक केली होती. मात्र, महाराष्ट्राचा प्रमुख असलेल्या शेख याची पथकाकडून चौकशी सुरू होती. अखेर त्यास पोलिसांनी अटक केली. शेख विरोधात देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. आरोपीला ए.टी.एसच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयिताला टेरर फंडिंग मिळाली आहे का, याची शहानिशा करणे आहे. त्याचबरोबर बँक खाती तपासणे आहे. त्यामुळे कोठडीची विनंती करण्यात आली. त्यावरून आरोपीला ९ दिवसांची कोठडी सुनावली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या