23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत पोलिस-दरोडेखोर फिल्मीस्टाईल थरार

औरंगाबादेत पोलिस-दरोडेखोर फिल्मीस्टाईल थरार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र चोरच खुद्द पैठण शहराच्या दिशेन आले आणि सुरु झाला चोर पोलिसांचा खेळ. पुढे दरोडखोरांची गाडी मागून पोलिसांची एक चारचाकी आणि दुचाकीने पाठलाग सुरु झाला. १५ ऑगस्च्या मध्यरात्री सुरु झालेला हा थरार तब्बल अर्धा तास चालला. मात्र पैठण पोलिसांनी दरोडेखोरांच्या गाडीला घेरावा घालत अखेर त्यांना ताब्यात घेतले. सोमनाथ दादासाहेब नरवडे (वय २० वर्ष, रा. घोटण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि स्वप्नील मारोती दराडे (वय १९ वर्ष, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आरोपींचे नावं आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन पैठण हद्दीमध्ये रात्रीच्या साडेबारा वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातुन कोपरगाव व नाशिक येथे माल वाहतुक करणारा ट्रकला एका बोलेरो वाहनातील दोन इसमांनी रहाटगाव फाटा येथे अडवले.ट्रक चालक व वाहकाला तलवारीचा धाक दाखवुन त्यांना चापटबुक्क्याने लाथाने मारहाण करुन त्यांच्याकडील १४०० रुपये बळजबरीने काढुन घेतले. या घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांचा स्टाफ घटनास्थळाकडे रवाना झाला. मात्र त्याचवेळी आरोपी सुद्धा पैठणकडे येत असल्याची माहिती पवार यांना मिळाली.

ट्रक चालकांना लुटणारी चारचाकी पैठणकडे येत असल्याची माहिती पवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून आरोपींनी गाडी पैठण शहाराकडे वळवली. मग पुढे दरोडेखोर मागे पोलीस असा खेळ सुरु झाला. याचवेळी शहरात दुचाकीवरून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांकडून सुद्धा आरोपींच्या गाडीचा पाठलाग सुरु झाला. त्यांनतर अर्ध्या तासांनी पोलिसांनी आरोपींना अखेर अडवून ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या