21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादमध्ये पेटले पोस्टरवॉर

औरंगाबादमध्ये पेटले पोस्टरवॉर

‘लव्ह औरंगाबाद’समोर ‘नमस्ते संभाजीनगर’

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शहराच्या नामांतरावरून राजकारण रंगले असताना भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद दौºयावर येणार असल्याची चर्चा असतानाच ‘लव्ह औरंगाबाद’ बॅनरच्या समोर भाजपने ‘नमस्ते संभाजीनगर’ असे पोस्टर झळकावले आहेत.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला होता. मात्र, या मुद्यावर सरकारमध्येच दोन गट पडले आहेत. शिवसेना नामांतराच्या मुद्यावर ठाम आहे तर काँग्रेसने मात्र विरोध केला आहे. या मुद्यावर भाजपने सरकारवर जोरदार टीकाही केली होती. त्यामुळे नामांतराचा हा वाद अधिकच पेटला आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘लव्ह औरंगाबाद’ असे फलक लावण्यात आलेल्या भागात ‘नमस्ते संभाजीनगर’ असे फलक लावले.

शहरात महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या दौºयाच्या निमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनीही ही वेळ साधत शिवसेनेला मात देण्यासाठी शहरात ‘नमस्ते संभाजीनगर’चे पोस्टर झळकावले आहेत.

कार्पोरेट कंपन्या लस खरेदीच्या तयारीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या