24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था

औरंगाबादमध्ये बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत औरंगाबादमध्ये प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.तिस-या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे च दुस-या लाटेतही २०० पर्यंत बालकांना कोरोनाची लागण झाल्याने विविध रुग्णालयात केवळ बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ प्राणवायू सुविधेच्या खाटा असणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे. तसेच एमजीएम आणि मेल्ट्रॉनमधील बाल कोविड केंद्रातही मनपाचे डॉक्टर कार्यरत असतील, असेही त्यांनी सांगितले.

शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. दररोज रुग्णसंख्या कमी निघत असून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिस-या लाटेत बालकांना सर्वाधिक लागण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्य सरकारने बालकांना तातडीने उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे.

डॉ. नीता पाडळकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. गरवारे कंपनीत शंभर खाटांचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासोबतच एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शंभर खाटांचे बाल कोविड सेंटर तयार केले जात आहे. तसेच केवळ कोविड केअर सेंटर आठ असून त्यामध्ये २४२ खाटांची व्यवस्था असणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर ६, एनआयसीयूचे २४, पीआयसीयू २० व इतर १९८ बेड राहतील. केवळ कोविड सेंटर नऊ असणार असून त्यामध्ये ३९४ खाटा राहणार असून व्हेंटिलेटरचे ३९, एनआयसीयू ४९, पीआयसीयू ९४, इतर २५१ सुविधांच्या खाटा राहतील. मेल्ट्रॉनमध्ये बालकांसाठी ५० बेडची व्यवस्था असेल , असेही पाडळकर यांनी सांगितले.

अभ्यास-संशोधन, दावे-प्रतिदावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या