30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादपं. नाथराव नेरळरकर यांचे औरंगाबादेत निधन

पं. नाथराव नेरळरकर यांचे औरंगाबादेत निधन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (८७) यांचे आज रविवार, दि. २८ मार्च रोजी औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल ६ दशकांहून अधिक काळ पं. नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली. संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

पंडित नाथराव नेरळकर यांचे जन्मगाव नांदेड आहे. त्यांच्या पश्चात अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी ही मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर १९५८ ला त्यांनी अनंत संगीत महाविद्यालयाची स्थापना केली आणि संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले. पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाने मराठवाड्यातील संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता. यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

विख्यात शास्त्रीय गायक पंडित अण्णासाहेब गुंजकर यांची संगीत परंपरा त्यांनी पुढे नेली. शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि सर्व स्तरातील श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. नांदेड येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या संगीत शंकर दरबारात त्यांची आवर्जून हजेरी असायची. त्यांच्यामुळे जागतिक कीतीर्चे अनेक गायक, वादक मराठवाड्यातील संगीत महोत्सवात सहभागी झाले. पंडित नाथराव नेरलकर यांच्या निधनाने मराठवाड्याचे संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यात कोरोनाचा कहर, २४ तासांत तब्बल ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या