20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeऔरंगाबादमहाराष्ट्रातून बाहेर पडताच राहुल गांधी भावूक; पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

महाराष्ट्रातून बाहेर पडताच राहुल गांधी भावूक; पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रतून दोन दिवासांपूर्वी निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. जे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

महाराष्ट्रातील महापुरुष, विचारवंत, संतांचा वारसा घेऊन निघालो आहे. देशाला पुरोगामी विचार देणा-या महाराष्ट्राचे धन्यवाद. अशा शब्दात आभार मानले. तसेच, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या समस्यांमुळे व्यथीत झालो. अशी निराश भावना राहुल गांधी यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेकांशी गाठीभेटी घेतल्या. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या भारत जोडो यात्रेला सहभाग नोंदविला. राहुल गांधी यांनी निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

सर्वांना जय शिवाजी जय महाराष्ट्र
शिवाजी महाराजांचे शौर्य, बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, महात्मा फुले यांची शिकवण, आणि सर्व महाराष्ट्रवासियांचे प्रेम प्रेरणा समजून पुढे जात आहे. या सत्कार आणि अभूतपूर्व अनुभवासाठी मी प्रदेशातील लोकांचे मनापासून आभार मानतो. जय शिवाजी, जय महाराष्ट्र! असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या