22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeऔरंगाबादअल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बाथरूममध्ये आंघोळ करीत असल्याचे पाहताच २१ वर्षीय नराधमाने तिचे तोंड दाबून फरफटत शेतात नेत बलात्कार केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. अनिकेत ऊर्फ अन्या ज्ञानेश्वर चव्हाण (वय-२१वर्षे, रा. गवळीशिवरा, ता. गंगापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडितेला आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाताना आरोपी अनिकेतने पाहिले होते. बाथरूममध्ये जाताच आरोपी पीडितेचे तोंड दाबून तिला फरफटत गायरान शेतीमध्ये घेऊन गेला. जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर पाशवी बलात्कार केला आणि पसार झाला.

भेदरलेल्या पीडितेने घडलेली घटना तिच्या घरच्यांना सांगितली. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या