30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादजालन्यात पुन्हा सात पॉझिटिव्ह

जालन्यात पुन्हा सात पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर : एकूण संख्या 51 वर पोहचली

जालना : जालन्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. जिल्ह्यात पुन्हा नवीन सात रूग्णांची भर पडली असून आता जिल्ह्याची एकूण संख्या 51 वर पोहचली आहे. जिल्हा रुग्णालयाने बुधवारी जिल्ह्यातील एकूण 137 संशयीत रुग्णांचे लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते.

Read More  थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा, आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद

याबाबतचा अहवाल काल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. यामध्ये भोकरदन येथे ठेवण्यात आलेल्या राज्य राखीव दलातील 62 जवान, नवीन जालना भागातील खाजगी रुग्णालयाशी संबधित 24 ते 25जण , जिल्हा रुग्णालयातील 32, मंठा तालुक्यातील पेवा येथील 15 आणि परतूर येथील 2 अशा 137 जणांचा समावेश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जुना जालना भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एका नामांकित खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी,नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयातील 1,भोकरदन येथील एक जवान आणि मंठा तालुक्यातील पेवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला एक जण असे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. यामुळे जालना जिल्ह्याने कोरोनाचे अर्धशतक पूर्ण केले असून कोरोनाचा जिल्ह्यावरील विळखा अधिकच वाढत असल्याने आता जिल्ह्यातील जनतेसह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या