22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeऔरंगाबादधक्कादायक : औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूचा आकडा शंभरीच्या पुढे

धक्कादायक : औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूचा आकडा शंभरीच्या पुढे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी 64 आणि दुपारी 6 रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 70 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2020 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 103 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 727 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये भावसिंगपुरा (1), बजाजनगर, वाळूज (1), हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन -नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्त‍िया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. त्यानंतर दुपारी आढळून आलेल्या 6 बाधितांमध्ये भीम नगर , भावसिंगपुरा (1), संजय नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), तारांगण, पडेगाव (1), अमोदी हिल, पहाडसिंगपुरा (1), घाटी परिसर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 31 महिला आणि 39 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Read More  टेनिसपटूंवरील आर्थिक संकट गडद!

727 रुग्णांवर उपचार सुरू
रविवारी सकाळी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा अहवालानुसार 64 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2014 वर गेली. त्यापैकी 1 हजार 184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत 103 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 727 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आणखी 4 रुग्णांचा मृत्यू; कोरोनाच्या बळीची संख्या 103 वर
कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. रविवारी आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अल्तमश कॉलनी येथील 70 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देवडी बाजार येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कैलासनगर येथील 56 वर्षीय महिलेचा शनिवारी रात्री 9.30 वाजता मृत्यु झाला. त्यानंतर रविवारी दुपारी 3 वाजता बारी कॉलनी येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत 103 वर पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2020
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1184
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 103
  • उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 727
  • दिवसभरातील नवीन रुग्णांची संख्या 70

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या