31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeऔरंगाबादहुंड्यासाठी मुलीच्या डोळ्यात काढला दोष ; पित्याने केली नेत्रज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी

हुंड्यासाठी मुलीच्या डोळ्यात काढला दोष ; पित्याने केली नेत्रज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : आपल्या लहान मुलीला आई,वडील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. कालांतराने मुलीचे वय झाल्यानंतर तिचे लग्न करावे लागते. लग्न म्हणजे एखाद्या मुलीच्या आणि आई,वडीलांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण समजला जातो. लग्नासाठी अनेक स्वप्न मुलगी आणि तिच्या आई-वडीलांनी पाहिलेली असतात. मात्र जेव्हा ती वेळ येते तेव्हा धक्काच बसतो कारण मुलगी सुंदर, देखणी रुपवान असली तरी हुंडा दिला नाही तर त्याला काहीच अर्थ नाही अशी सध्या समाजात परिस्थिती झाली आहे.

औरंगाबादेतही असाच एक प्रकार समोर आला आहे. हुंडा न देऊ शकणा-या मुलीच्या वडीलांना सांगण्यात आलेय की तिच्या मुलीच्या डोळ्यात दोष आहे. वडीलांनी मुलीची नेत्रतज्ज्ञाकडून तपासणी करून घेऊनही लग्नाला वारंवार नकार घंटा देणा-या वर मंडळींच्या विरोधात मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली असून बेगमपुरा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वधु-वर परिचय मेळाव्यात झाली ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू गणेशनगर येथील रहिवासी ५७ वर्षीय पिता आपल्या मुलीसाठी वर शोधत होते. एका वधु-वर परिचय मेळाव्यात बुलडाणा जिल्ह्यातील दाते कुटुंबाची ओळख झाली.

नंतर केली पैशाची मागणी 
साखरपुडाचा कार्यक्रमही ठरला. एक मार्च रोजी सायंकाळी पाच ते साडेसहाच्या दरम्यान या कार्यक्रमानंतर वर मंडळीने पैशांची मागणी केली. पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचे सांगत लग्नाला नकार दिला.

नकार दिल्याने वडीलांनी केली मुलीच्या डोळ्याची तपासणी
साखरपुडाचा कार्यक्रमही ठरला. वर पक्षाकडील काही नातेवाईकांनी मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचे सांगत नकार दिल्यामुळे वधु पित्याने एका नेत्ररोग चिकित्सकाकडून मुलीच्या डोळ्याची तपासणी करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या