औरंगाबाद : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सहा दिवसांपासून सुरू असलेला शहरातील कडक लॉकडाऊन उद्या बुधवार, 20 रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पाण्डेय यांनी 21 ते 31 मेपर्यंत या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली करण्यास सहा तासांची परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवार, 21 मेपासून सकाळी 7 ते दुपारी १ल1 वाजेपर्यंत अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध विक्रीची दुकाने सुरू ठेवली जातील, असे आदेश काढण्यात आले आहेत.
Read More तरुणीचा मृतदेह समजून नातेवाईकांना दिला तरुणाचा मृतदेह
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात गुरुवार, 14 रोजी मध्यरात्रीपासून बुधवार, 20 मे रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात कडक लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. सहा दिवसांच्या या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात येईल, असा विश्वास मनपा आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वयेच हा कडक लॉकडाऊन अंमलात आणला जात आहे. तो आता बुधवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाढविलेल्या 31 मेपर्यंतच्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी वेंâद्राच्या सूचनेनुसार सुधारित आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शहरात 21 ते 31 मेपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत या सहा तासांच्या वेळात शहरात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, किराणा सामान विक्री करणारी दुकाने उघडी राहतील. हातगाड्यांनाही परवानगी आहे. मात्र, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग (सुरक्षित अंतर), सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बाजारपेठांच्या ठिकाणी रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. यासह उपचाराच्या अत्यावश्यक सेवांना जसे की मेडिकल स्टोअर्स, औषधनिर्मितीचे उद्योग या आस्थापनांना परवानगी कायम आहे.
या नियमांचे पालन करणे आवश्यक
– बाजारपेठांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी
– प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग राखला जाईल, याची काळजी घ्यावी
– हातगाडीचालकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा
– दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे
– आस्थापनांनी परिसरात रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे
– सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहतील