22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeऔरंगाबादमराठवाड्याला भरीव निधी देणार

मराठवाड्याला भरीव निधी देणार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाडा पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करून देईल. तसेच यापुढे विकासकामांचा मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाड्यातील विविध विकासकामांच्या घोषणाही त्यांनी केल्या. यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी जिल्हानिहाय घोषणा केल्या.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरुवात झाली, असे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यू पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ आदी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम इतिहासातील देदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे गरजेचे आहे. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे आदींनी मोठे योगदान दिले. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. त्यांच्या योगदानातूनच या भागाला स्वातंत्र्याची फळे चाखता आली, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक विकासकामांच्या घोषणा केल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ परिसराचा विकास, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भूसंदपादन, क्रीडा विद्यापीठाची स्थापना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, शहराच्या जून्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डी येथे जाण्यासाठी १७ कि.मी. पोच मार्गाची दर्जोन्नती. विश्वास नगर, लेबर कॉलनी येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकूल व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मराठवाडा वाटर ग्रीडमध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील चार धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करणार, अशा घोषणा केल्या. जालना जिल्ह्यासाठी अंबड येथे भुयारी गटार योजना, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर परिसराचा विकास आदी कामे, परभणी जिल्ह्यात शहरासाठी पाणीपुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा अशा ब-याच घोषणा केल्या.

हिंगोलीत हळद संशोधन केंद्रासाठी जागा देणार
हिंगोली जिल्ह्यात श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदीर परिसराच्या विकास, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदीर संस्थान परिसराचा विकास, कुरुंदा (ता. वसमत) येथे पूर प्रतिबंधक कामे केली जाणार असल्याची घोषणा केली.

नांदेडमध्ये बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प
नांदेड जिल्ह्यात क्रीडा संकुलासाठी जागा, नांदेड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, घनकचरा प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प, नांदेड शहरातील भूयारी गटार योजना पूर्ण करण्याची घोषणा केली.

लातूर जिल्ह्यासाठीही घोषणा
लातूर जिल्हा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागा, विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम, मराठवाडा वॉटर ग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी यशवंत सागर जलाशय उजनी येथून ११२ द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध करणे आदी घोषणा केल्या.

उस्मानाबादेत वैद्यकीय कॉलेज सुरू करणार
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी नदीजोड प्रकल्प,श्री तुळजाभवानी मंदीर व परिसराचा विकास करणार, तसेच बीड जिल्ह्यात जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम करण्याची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या