24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔरंगाबादबिडकीनमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

बिडकीनमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नसतानाच आता बिडकीनमध्ये एका ७५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बिडकीनमधील भारतनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून, या महिलेच्या डोक्याला प्रचंड मार लागलेला, तसेच घरातील गादी जळालेल्या अवस्थेत सापडल्याने या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुळची पैठण तालुक्यातील जांभळी येथील रहिवाशी असलेली हलिमा आपा नावाची ही महिला गेल्या सात-आठ वर्षांपासून बिडकीनच्या भारतनगर भागात खोली करून राहात होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह त्याच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. हलिमा आपा यांच्या डोक्याला मोठी जखम असल्याच्या खुणा होत्या. तसेच त्यांच्या घरातील गादीही जळालेल्या अवस्थेत होती. घरातील काही सामानही विखुरलेले होेते.

याबाबत माहिती मिळाल्यावर बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जगदीश मोरे, संजय चव्हाण, एस.एस. कदम, शिवानंद बनगे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिडकीनच्या सरकारी रूग्णालयात दाखल केला. तेथे डॉ. संजय गोरे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. संशयास्पद मृत्यू असल्याने पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनीही घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.

अकस्मात मृत्यू की खून
हलिमा आपा यांचा मृतदेह आढळल्यानंतर प्रथमत: घरात काम करताना खूर्चीवरून पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर गादी घरात शॉर्टसर्किने आग लागून जळाल्याची चर्चा होत होती. मात्र,

घटनास्थळाची परिस्थिती पाहता हलिमा आपा यांचा खून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद घेतली असली तरी पोलिस खुनाची शक्यताही पडताळून पाहात आहेत. हलिमा यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करतानाच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या