26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeऔरंगाबादव्हाट्सअप स्टेटसवरून गंगापुरात तणाव

व्हाट्सअप स्टेटसवरून गंगापुरात तणाव

एकमत ऑनलाईन

गंगापूर : एकीकडे व्हाट्सअप ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा पुरवत असताना दुसरीकडे याचा व्हाट्सअपवरील एका आक्षेपार्ह स्टेटसने अवघे गंगापूर शहर वेठीस धरले गेले आहे. एका तरुणाने व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कृती केल्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, विरोधी धर्माच्या तरुणांच्या टोळक्याने व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टोळीतील ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल फायदन त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तणाव आणखी वाढू नये यासाठी पोलिसांनी शहरात रूट मार्च काढून शहरावर ताबा मिळविला आहे. अपर पोलिस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी गंगापुरात तळ ठोकून बसले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १०) रात्री ११ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या आक्षेपार्ह मजकुराचा स्टेटस ठेवला होता. ही बाब मुस्लिम समाजाच्या काही जणांच्या लक्षात आली. त्यानंतर काही वेळातच शहरात जमाव तयार झाला. याच वादातून नंतर मुस्लिम धर्माच्या १२ ते १५ तरुणांनी स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाया गाठून घेराव घातला. यावेळी त्याला धमकावून शिवीगाळ करीत रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. धारदार शस्राने त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याचवेळी त्याच्या मोटारसायकलचीही तोडफोड करण्यात आली.

ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तसेच त्या तरुणावरील गंभीर हल्ला तसेच त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सोबतच स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. यानंतर विलंब न करता कलवानिया, डॉ. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक विलास गुसिंगे, हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, प्रकाश बर्डे, पोलिस नाईक योगेश हरणे, अंमलदार बलबिरसिंग बहुरे, रिजवान शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणतानाच मारहाणीचा गुन्हा करून फरार झालेल्यांपैकी ११ आरोपींना रात्रीतून शिताफीने शोध घेत अटक केली .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या