24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeऔरंगाबादलाचखोर हवालदार रंगेहाथ पकडला

लाचखोर हवालदार रंगेहाथ पकडला

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराला १ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड करीत ६० हजार रुपये घेताना पोलिस हवालदार गणेश ज्ञानेश्वर अंतरप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही घटना १ जून रोजी सकाळी कारवाई एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या प्रवेश दारावर झाली.

या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज परिसरातील एका कंपनीने तक्रारदार गांजा विक्री करतो, असा अर्ज दिला होता. मात्र त्यांनी यासबंधी अधिकृत तक्रार नोंदविण्यास नकार दिला होता. दरम्यान हा अर्ज हवालदार अंतरप यांच्याकडे होता. त्यांनी तक्रारदार यांस संपर्क करून त्याला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दिड लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंतरपविरूध्द तक्रार नोंदविली.

आरोपी हवालदार अंतरप यांनी तडजोड करीत आज सकाळी ६० हजार रुपये पोलिस ठाण्यात आणून देण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी साध्या वेशात ठाण्याबाहेर सापळा रचला. १० वाजेच्या सुमारास हवालदार अंतरप यानी तक्रारदाराकडून ६० हजार रुपये लाच घेताच एसीबीच्या अधिका-यांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस ठाण्याच्या गेटवर झाली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

देशात लवकरच चौथा सीरो सर्वे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या