औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 1200 च्या पार

327

दिवसभरात 32 नवे पॉझिटिव्ह

औरंगाबाद | जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांनी 1200 चा टप्पा ओलांडला आहे.

Read More  केंद्र सरकारने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली

आज औरंगाबादेत 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून दिवसभरात दोन जणांचा बळी या आजारानं घेतला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दोन रुग्णांमध्ये बहादूरपुरा येतील 70 वर्षीय वृद्ध महिला आणि संजयनगर येथील 41 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळं औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 हजार 218 इतकी झाली असून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 44 वर गेली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 538 रुग्ण या आजारातून बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.