32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजारांच्या पार

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजारांच्या पार

एकमत ऑनलाईन

व्हायरसने मोठा कहर केला : आतापर्यंत एकूण 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद :  मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. जिल्ह्यात आज सायंकाळी 33 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 22 पुरूष, 11 महिला आहेत. आज सकाळी जिल्ह्यात 208 रुग्णांची वाढ झाली होती. आणि आता नव्याने 33 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 हजारांच्या पार गेली आहे. आतापर्यंत एकूण 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2314 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

सादात नगर (1), एन चार सिडको (2), सिंधी कॉलनी (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), एन चार समृद्धी नगर, सिडको (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (2), एन सात, सिडको पोलिस स्टेशन जवळ, सिडको (3), एन चार सिडको (1), सराफा रोड (4), गारखेडागाव (1), सातारा परिसर (1), एन नऊ (1), मुकुंदवाडी, रोहिदास नगर (1), लोटा कारंजा (1), साई नगर, गारखेडा (1), द्वारकापुरी, उस्मानपुरा (1), न्यू मोंढा, गोकूळ नगर (1), श्रीगणेश रेसिडन्सी, चिकलठाणा (2), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (1), बँक कॉलनी, गारखेडा (2),

ग्रामीण भागातील रुग्ण (4)

चिंचबन कॉलनी, बजाज नगर (1) साई श्रद्धा पार्क, बजाज नगर (2), शिवाजी नगर, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

दिवसभरात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) 27 जून रोजी औरंगाबादेतील सिटी चौक परिसरातील 75 वर्षीय पुरूष, खुल्ताबाद येथील 60 वर्षीय स्त्री, सादात नगरातील 59 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 65 वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील रामकृष्ण नगरातील 72 वर्षीय स्त्री, 28 जून रोजी वैजापुरातील 60 वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील एन सात सिडकोतील 70 वर्षीय पुरूष आणि क्रांती चौक, सिल्लेखाना येथील 60 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात औरंगाबादेतील एन बारा टीव्ही सेंटर येथील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये आतापर्यंत एकूण 190 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 186 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 186, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 50, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 247 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Read More  चांद नवाब २ : पाकची गाढव गाडी तुफान व्हायरल: तुम्ही पाहिला का व्हीडीओ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या