25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔरंगाबादउधारीचे पैसे न दिल्याने दुकानदाराने ठेवला बॉम्ब

उधारीचे पैसे न दिल्याने दुकानदाराने ठेवला बॉम्ब

एकमत ऑनलाईन

कन्नड : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात ४ दिवसांपूर्वी बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र अखेर पोलिसांनी बॉम्ब ठेवणा-या व्यक्तीला शोधून काढले आहे. मित्राकडे असलेले उधारीचे पैसे अनेकदा मागूनसुद्धा परत करत नसल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी एका इलेक्ट्रीकलची दुकान चालवणा-या व्यक्तीने हा बॉम्ब ठेवला असल्याचे समोर आले आहे.

रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (२६, म्हाडा कॉलनी, कन्नड, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. कन्नड शहरातील मुख्य मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर ९ जून रोजी मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये कमी तीव्रतेचा बॉम्ब मिळून आला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सुरक्षितपणे त्याला हाताळून निर्जनस्थळी नेऊन नष्ट केला होता.

यावरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड शहर व ग्रामीण पोलिसांची ४ पथके तयार करून घटनेच्या अनुषंगाने तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, कन्नड येथील हिवरखेडा रोडवर इलेक्ट्रीकल व रुद्रा रेफ्रीजरेशन नावाचे दुकान चालवणा-या रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे याने हा बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांनतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या