24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeऔरंगाबादबंडखोरांना आडवे करण्यासाठी आम्ही दोघेच पुरेसे

बंडखोरांना आडवे करण्यासाठी आम्ही दोघेच पुरेसे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादमधील पाच बंडखोरांना आडवे करण्यासाठी आम्ही दोघेच पुरेसे आहोत, असा इशारा शनिवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी बंडखोरांना दिला.

दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. त्यानंतर खैरेंनी त्यांना पेढा भरवला. यामुळे शिवसेनेत राहूनही त्यांच्यात असलेल्या अंतर्गत संघर्षावर तूर्तास पडदा पडला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची आणि पक्षातीलच आमदार अंबादास दानवे यांच्यातील बेबनाव सर्वश्रुत आहे. त्यांचा एकमेकांशी असलेला दुरावा अनेकदा जाहीर दिसूनही आला. याबाबत खुद्द चंद्रकांत खैरे यांनीही स्पष्टोक्ती दिलेली आहे. तरीही आज शिवसेनेच्या खडतर आणि संघर्षाच्या काळात त्यांच्यातील दिलजमाई महत्त्वाची मानली जात आहे. खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी एकत्रपणे काम करतो. दानवे मला गुरू आणि मी त्यांना शिष्य मानतो. १९९८ पासून आम्ही सोबत आहोत. लोकसभेच्या माझ्या पहिल्या निवडणुकीत त्यांच्यावर मी सर्व जबाबदारी दिली होती.

खैरे म्हणाले, मध्यंतरी आमची कुरबुर होत असेल, परंतु एका परिवारात असल्याने आमची कुरबुर होते, पण परत आम्ही एकत्र दिसतो. अंबादास दानवे यांच्यावर माझे प्रेम आहे. पण दोघांत तात्त्विक मतभेद वाढत गेले पण त्यानंरही आमचे प्रेम जास्त वाढले. ते विरोधी पक्षनेतेपद गाजवतील. ते अभ्यासू आहेत.

पाच बंडखोरांना आडवे करू
खैरे म्हणाले, अंबादास दानवेंवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकला. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. हा पक्षाचा आदेश आहे आणि तो मी पालन करीत आहे. हे माझे कामच आहे. आज ते माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आले. औरंगाबादेत आम्ही दोघे शिवसेनेत सक्षम आहोत, आम्ही पाच बंडखोरांनाही आडवे करू.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या