20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

औरंगाबाद शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या उद्रेकामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत नसली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. आजघडीला शहरात २३५ व्हेंटिलेटर बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी समोर आली. या परिस्थितीमुळे सुविधेअभावी रुग्णांचा मृत्युदर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात १३ मोठी रुग्णालये (डीएचसी), ५६ डीसीएचसी आणि १७ कोविड केअर सेंटर्स आहेत. यामध्ये एकूण बेड्सची संख्या ७ हजार ८२६ इतकी असून त्यामध्ये व्हेंटिलेटरचे २३५ बेड्स, आयसीयूचे ६६४ बेड्स, नॉन आयसीयूचे २१७९ बेड्स आणि आयसोलेशनचे ४७४८ बेड्स आहेत. त्यापैकी व्हेंटिलेटरचे २३५, आयसीयूचे ६१२, नॉन आयसीयूचे १७४० आणि आयसोलेशनचे २८१२ बेड रुग्णांनी व्यापले आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक राहिलेला नसून आयसीयूचे केवळ ५२ बेड रिकामे आहेत. अशा परिस्थितीत गंभीर रुग्ण झाल्यास त्यास व्हेंटिलेटर मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तुटवड्याबाबत लोकप्रतिनिधी चिंतित
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजन इतर जिल्ह्यात निर्यात करू नये, याबाबत खा. डॉ. कराड यांनी भूमिका मांडली. खा. इम्तियाज जलील यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अधिक साठ्याबाबत विचारणा केली. आ. हरिभाऊ बागडे व आ. अतुल सावे यांनी ऑक्सिजनची आवश्यकता असणा-या रुग्णांनाच रेमडेसिवीर देण्याचे सूचित केले.

शहरापेक्षाही वेगाने ग्रामीण भागात कोरोनाची वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या