गोंडस मुलीला जन्म : बाळाचा पहिल्या दिवशीचा कोरोना अहवालही निगेटिव्ह
औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यात-देशात अनेक करुण कहाण्या आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत. त्यात आता आणखी एक दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे अवघ्या सात दिवसांत बाळ आईविना पोरकं झालं आहे. घाटी रुग्णालयात काल (4 जून) दुपारी दोन वाजता ही अत्यंत वेदनादायी घटना घडली.
शहरातील कटकट गेट भागातील 30 वर्षाची एक महिला 28 मे रोजी घाटी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचा पहिल्या दिवशीचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. आई आणि डॉक्टरांसाठी ही आनंदाची बातमी होती. बाळ-बाळंतीण सुरक्षित होते. पण 29 मे रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
बाळ कोरोना मुक्त राहावं म्हणून आई आणि बाळाला वेगळे ठेवण्यात आले. बाळाला नवजात शिशू विभागात ठेवलं. आईचं दूध बाळापर्यंत पोहोचवण्यात येत होतं. पण एक-दोन दिवसात महिलेला अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या महिलेला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. त्या बाळाने आईचा चेहराही लक्षात राहिला नसेल, शिवाय आईलाही बाळाला डोळे भरुन पाहिलं नसेल. मात्र त्याआधीच नियतीने त्यांची कायमची ताटातूट केली आहे.
Read More औरंगाबादेत आज 59 रुग्णांची वाढ