औरंगाबाद: उन्हाळ्याच्या सुटीत वाळूज येथे आजीकडे आलेल्या १३ वर्षीय मुलाला मोबाईलचे आमिष दाखवत भाडेकरूनेच अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाबू पुंजू सोनवणे(४२) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शाळेला सुटी लागल्याने १३ वर्षीय मुलगा एक आठवड्यापूर्वी वाळूजला त्याच्या आजीकडे राहण्यास आला होता. आरोपी बाबू हा आजीच्या घरात गेल्या ९ महिन्यांपासून भाडेकरू म्हणून राहात होता. तो मूळचा जळगावचा असून बायको व मुलांना सोडून उदरनिर्वाहासाठी वाळूजला राहात होता.
काही दिवसांपासून आरोपी बाबू हा पीडित मुलाला मोबाईल खेळण्यास देत होता. दरम्यान बाबूने गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास पीडित मुलाला कोप-यात असलेल्या लहानग्याला घरात नेत अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले. याबाबत पीडित मुलाच्या आजीला संशय आल्यामुळे आजीने आरोपीच्या खोलीत डोकावताच पीडित मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे आजीने पाहिले. त्यांनी पोलिसांना माहिती देत आरोपीला वाळूज पोलिसांच्या हवाली केले.