30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादप्रतिसाद मिळत नसलेले लसीकरण सेंटर्स हलवणार

प्रतिसाद मिळत नसलेले लसीकरण सेंटर्स हलवणार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ११५ वॉर्डांत जम्बो लसीकरण मोहीम सुरू केली आहे. तसेच लसीकरणाला सर्वत्र चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन आणि तीनमधील काही वॉर्डांत खूपच कमी प्रतिसाद मिळत असल्याने या भागातील लसीकरण सेंटर्स इतरत्र हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागील महिनाभरापासून शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढतच चालला आहे. वाढत्या रुग्णांच्या उपचारासाठी १४ कोविड केअर सेंटर पालिकेने सुरू केले आहेत. त्यासोबतच लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन केले जात आहे. त्यामुळे कोविड सेंटरमधील बेड रिकामे राहत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून शहरातील ११५ वॉर्डांत ११५ सेंटर सुरू करून जम्बो लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ५ एप्रिलपासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

प्रभाग क्रमांक चार ते नऊमधील नागरिकांकडून लस घेण्यासाठी सेंटर्सवर गर्दी होत आहे. मात्र प्रभाग क्रमांक एक, दोन, तीनमधील काही वॉर्डांतील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रभागांमधील प्रतिसाद मिळत नसलेले सेंटर्स इतरत्र हलवण्याचे पालिकेने ठरवले आहे.

चार दिवसांत १८ हजार डोस
जम्बो लसीकरण मोहिमेला सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील चार दिवसांत १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागाने शहर बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या