छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महलमध्ये आयोजित वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा तिसरा दिवस कथ्थक आणि शंकर महादेवन यांच्या सुमधूर संगीताने संस्मरणीय ठरला. तीन दिवस चालणा-या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. तब्बल ७ वर्षांच्या खंडाने यंदा हा महोत्सव पुन्हा होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाची सांगता झाली असली तरी यातील सादरीकरण प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहील.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला संगीता मुजूमदार (स्ट्रग्सि एन स्टेप्स ग्रुप) यांचे कथ्थक आणि पद्मश्री शंकर महादेवन यांचे उपशास्त्रीय, नाट्य व सुगम गायन यांचे सादरीकरण झाले. या वेळी सोनेरी महल परिसर प्रेक्षकांनी फुलून गेला होता. ‘शिव कैलास’ या संगीता मजुमदार आणि नीलरंजन मुखर्जी यांचा सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्ट्रिंग अँड स्टेप्सच्या कलाकारांमध्ये वादन आणि नृत्याची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. स्ट्रिंग अँड स्टेप्सचे नीलरंजन मुखर्जी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
हवाई गिटारच्या संचलनात त्यांनी रसिकांना आनंद दिला. स्ट्रिंग अँड स्टेप्सचे नीलरंजन मुखर्जी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. हवाई गिटारच्या संचलनात त्यांनी रसिकांना आनंद दिला. यावेळी शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांना सहभागी करून घेत शंकर महादेवन यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या शेवटच्या गायक शंकर महादेवन यांनी हिंदी-मराठी गीत, कर्नाटकी शास्त्रीय संगीत सादर केले. मराठवाड्याच्या मातीतील प्रा. गणेश चंदनशिवे यांनी पद्मश्री शंकर महादेवन यांना दिलेली साथ लक्षवेधी ठरली. मराठवाड्याच्या मातीतील प्रा. गणेश चंदनशिवे यांच्यासोबत ‘आई तुझी कानडी बोली ग येल्लामा…’ हे लोकगीत शंकर महादेवन यांनी सादर केले.
बाहेर थांबून घेतला प्रेक्षकांनी आनंद
तिकिट न मिळालेल्या प्रेक्षकांसाठी बाहेर स्क्रीनवर कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येथेही प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. आतमध्ये जाता आले नसल्याने बाहेर प्रवेशद्वाराजवळ स्क्रीनवर पाहून आनंद घेतला. त्यावरून गर्दीचा अंदाज येतो.