17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home औरंगाबाद जायकवाडी धरणाची पाणी पातळी ८५.५८ टक्के वर पोहचली

जायकवाडी धरणाची पाणी पातळी ८५.५८ टक्के वर पोहचली

एकमत ऑनलाईन

पैठण । जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत दिवसागणित वाढ होत असुन, आजरोजी धरणाची पाणी पातळी ८५.५८ टक्के वर पोहचली आहे. धरणातील आवक लक्षात घेता नजीकच्या काळात जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडावे लागणार असल्याने, गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

दरम्यान जायकवाडी धरणात येणारी आवक कमी अधिक होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर १५ सप्टेंबर नंतरच पाणी सोडावे लागणार आहे. गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यास नदीकाठच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका किंवा जीवितहानी वा नुकसान होणार नाही. याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जायकवाडी प्रशासनाला दिल्या आहेत.

  • १) जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी: १५१९.२५ फुटामध्ये
  • २) जायकवाडी पाणीपातळी: ४६३.०६७ मीटरमध्ये
  • ३) आवक : १२५९७ क्युसेक
  • ४) एकूण पाणी साठा: २५९४.८६७ दलघमी
  • ५) जिवंत पाणी साठा: १८५६.७६१ दलघमी
  • ६) धरणाची टक्केवारी: ८५.५२%
  • ७) उजवा कालवा विसर्ग : निरंक
  • ८) पैठण जलविद्युत केंद्र : निरंक
  • जायकवाडी धरणाची सकाळी ६:०० वाजताची स्थिती

लज्जास्पद घटना : विधवा महिला आणि दिव्यांग मित्राचं मुंडण करून तोंडाला फासलं काळं

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या