औरंगाबाद : जास्तीचे पाणी सोडण्यासाठी अनेक जण वॉलमॅनला हाताशी धरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आता कोणत्या भागात किती वेळ पाणी सोडले. वॉल्व्ह किती वेळ उघडला, किती वेळात बंद केला याची माहिती ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
दोन हजार ९०० वॉल्व्हचे लोकेशन मॅप करण्यात आले असून, जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून वॉलमनला पंच बंधनकारक केले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ३१ टाक्यांवरून सध्या शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी तीन हजार ५०० वॉल्व्ह आहेत. यातील दोन हजार ९०० वॉल्व्हचे लोकेशन मॅप करण्यात आले आहेत. पाणी सोडणा-या २९० वॉलमॅनला अॅन्ड्रॉईड मोबाईल देण्यात येणार असून, त्याचे जिओ फेन्सिंग करण्यात येणार आहे.