26 C
Latur
Friday, July 11, 2025
Homeसोलापूरसर्व दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा

सर्व दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा

सोलापूर : महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात येत असून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना प्रतिवर्ष प्रती कुटुंब रक्कम रुपये ५ लाखाचे आरोग्य विमा संरक्षण म्हणजेच मोफत औषधोपचार शहरातील निवडक ११ प्रतिष्ठित रुग्णालयातून सद्यस्थितीत लाभ मिळत असून लवकरच अन्य काही रुग्णालये यात समाविष्ट होणार आहेत.त्याकरिता आयुष्मान गोल्डन कार्ड प्रत्येक लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.

हे कार्ड काढण्यापूर्वी लाभार्थ्याची ई केवायसी होणे गरजेचे आहे .ही सेवा महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे येथे सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे.. सर्व पात्र नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.. याशिवाय शहरातील सर्व आपले सरकार महा ई सेवा केंद्रावर सदर सेवा उपलब्ध आहे..याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे..

१. मोबाइल नंबर लिंक केलेले आधार कार्ड
२. शासनमान्य अन्य कोणतेही ओळखपत्र
३. आधार लिंक केलेला मोबाइल फोन

यापैकी एखादे कागदपत्र नसले तरी हे कार्ड काढता येते.. जवळच्या नागरी आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा.. नागरिकांनी गुगल प्ले स्टोरवर जाऊन आयुष्मान भारत ॲप डाऊनलोड करून बेनिफिशअरी लॉगीन मधून आपले कार्ड घरबसल्या काढू शकतात. सद्यस्थितीत सोलापूर शहरातील ५ लाख नागरिक याकरिता पात्र असून त्यापैकी ९७,५०८ नागरिकांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना शासनाच्या वतीने गोल्डन कार्ड वितरीत करण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR