23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

बदलापूर : बदलापूर येथील आदर्श शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची गावक-यांनी तोडफोड केली आहे. तसेच, त्याच्या कुटुंबालाही गावातून हुसकून लावले आहे. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार केल्याचा अक्षयवर आरोप आहे. पलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली असली तरी या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, लोकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बदलापूरमधील स्थानिक पालक आणि गावकरी यांच्या मनात अजूनही संताप कायम आहे.

या संतापातूनच गावक-यांनी आरोपी अक्षयच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढले आणि खरवई गावातूनही हुसकून लावले. बदलापूर येथील साडेतीन वर्षे वयाच्या दोन मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनामुळे नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी शाळेची तोडफोडही केली. तसेच बदलापूर स्टेशनवर रेल रोको केला होता. दरम्यान आता संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली, असा दावा अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR