22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबागेश्वर बाबांनी घेतले तुकाराम महाराजांचे दर्शन

बागेश्वर बाबांनी घेतले तुकाराम महाराजांचे दर्शन

देहू : अनेक ठिकाणी भव्य दरबार भरवून लोकांच्या मनातले सांगणारे बागेश्वर बाबा यांनी आज देहू येथे संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांआधी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

यानंतर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेत जाहीर माफी मागितली होती. सध्या पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे.

बागेश्वर बाबा यांनी देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतूक केले. काही दिवसांआधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुकाराम महाराजांबद्दल तसे माझ्या वाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असे ते म्हणाले.

यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागतो, असे बागेश्वर बाबा म्हणाले. बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी देहू येथे बागेश्वर बाबा येणार असल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR