वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, १५ जण अटकेत

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीबनगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला २० मे २०२६ रोजी हिंसक वळण लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर कारवाई सुरू असताना काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली होती. या कारवाईच्या दुस-या दिवशी काही रहिवासी आणि समाजकंटकांकडून विरोध सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दगडफेक करणा-यांची ओळख पटवत १५ जणांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियोजनानुसार सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news