मुंबई : मुंबईतील अनेक भागांमध्ये ‘बंटेंगे तो कटेंगे’चे पोस्टर लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हे घोषवाक्य असून हरियाणा विधानसभा निवडणुकीतही याचा वापर करण्यात आला होता. आता, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही हे घोषवाक्य ऐकायला, पाहायला मिळत आहे. भाजपचे समर्थक विश्वबंधू राय यांनी हे पोस्टर ठिकठिकाणी लावले आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आम्ही त्यांना प्रत्युत्तर देत आहोत.
उत्तर भारतातील नागरिक योगी आदित्यनाथ यांना मानतात, तसंच त्यांचे घोषवाक्य ‘बंटेंगे तो कटेंगे’ यावरही विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातही विरोधकांच्या डावपेचांना अशापद्धतीने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हरियाणातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला कशाप्रकारे समर्थन दिलं हे आपण पाहिलंच आहे. हीच युक्ती आम्ही महाराष्ट्रातही वापरणार आहोत.’