नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचे कलेक्शन असणा-या एका पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
आज श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. तसंच, जगभरात श्रीरामावर आधारित असणा-या सर्व टपाल तिकिटांचा एक अल्बम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निमित्ताने मी देशातील सर्व नागरिकांचं आणि जगभरातील राम भक्तांचं अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
या टपाल तिकिटावर श्रीराम मंदिर, ‘मंगल भवन अमंगल हारी’ ही ओळ, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आजूबाजूच्या मूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. इतर तिकिटांमध्ये श्रीराम मंदिर, भगवान गणेश, श्री हनुमान, जटायू, केवटराज आणि माता शबरी यांचा समावेश आहे. या तिकीटाच्या डिझाईनमधून आकाश, हवा, अग्नी, पृथ्वी आणि जल असे पंचमहाभूत दिसत आहेत.

