27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeसोलापूरदहा लाख हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण, पाचजणांविरुद्ध गुन्हा

दहा लाख हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण, पाचजणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : दहा लाख रूपये हुंड्यासाठी विवाहितेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाचजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पती फारूख वालीकर, सासरा बाशासाब वालीकर, सासू हसीना वालीकर, दीर सादिक वालीकर (रा. ओम नमः शिवाय नगर, होटगी रोड, सोलापूर), नणंद हीना ऊर्फ मालनबी शेख, तिचा पती नबीलाल शेख (दोघे रा. चडचण, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

यातील फिर्यादी आलिशा फारूख वालीकर (वय २८, रा. ओम नमः शिवाय नगर) ही सासरी नांदताना संशयितांनी तिला मूल होत नसल्याच्या कारणावरून तिचा छळ केला. तिला मूल न झाल्याने तिच्या पतीस अशा मुलीशी कशाला लग्न केला, असे बोलायचे. तिला आमचे घर सोडून जा, नाही तर मरून जा, म्हणायचे. सासू हसीना वालीकर हिने सतत भांडण करून तिला मारहाण केली. ती नमाज पठण करताना दीर सादिक याने तिला बाहेर हाकला अथवा तिचे पाय तोडून तलावात फेका, अशी दमदाटी करायचा. तसेच माहेरहून १० लाख रूपये हुंडा आण म्हणून तिचा शारिरीक, मानसिक छळ केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR