23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeबीडअपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

एकमत ऑनलाईन

विनायक मेटे यांच्या पत्नीची मागणी, नेमके कसे घडले कळायला हवे
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे काल अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. यातून अपघात नेमका कसा घडला, याची सर्वांना माहिती कळली पाहिजे, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली.

त्यांचे शरीर सांगत होते की अपघात झाल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात आणले गेले नाही. मी डॉक्टर असल्याने मला लगेच कळले की हा अपघात काही क्षणांपूर्वी किंवा अर्ध्यातासापूर्वी झाला नाही. किमान दीड ते दोन तास अपघात घडून झाले आहेत, हे मला पाहिल्याबरोबर कळले. काय झाले ते मला माहिती नाही. माझे ड्रायव्हरशी बोलणे झाले नाही, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली.

चौकशीची मागणी मी करणार आहे. कारण त्याच्यामध्ये काही फॉलप्ले नसला तरी मला हे कळणे गरजेचे आहे की, नेमका अपघात कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर त्यांनी माहिती दिली, असे ज्योती मेटे म्हणाल्या. अँब्युलन्सचा नंबर सगळ््याकडे असतो. ड्रायव्हर फोन करू शकला असता. तो आम्हाला लोकेशनदेखील देत नव्हता. त्या लोकेशनवर आम्हा अँब्युलन्स पाठवू शकू. त्यामुळे वैद्यकीय मदत कुठे पाठवावी, तेच कळत नव्हते. त्यामुळे मी मागणी करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रविवारी पहाटे ५ वाजता मेटे यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजूने धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेले, असे त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितले आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली, असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीची मागणी मेटे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या