22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeबीडधानोरा बुद्रुकमध्ये महिलांचा मारुती मंदिरात प्रवेश

धानोरा बुद्रुकमध्ये महिलांचा मारुती मंदिरात प्रवेश

एकमत ऑनलाईन

ग्रामस्थ महिलांचे परिवर्तनाच्या दिशेने पाऊल, महिलांचे कौतुक
अंबाजोगाई : राज्यातील बहुतेक मारुती मंदिरांत आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या धानोरा बुद्रुक येथील महिलांनी आज परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकले. गावातील सगळ््या महिला एकत्र येऊन त्यांनी मंदिरात प्रवेश करून मारुतीरायाचे दर्शन घेतले. महिलांच्या धाडसाचे परिसरात कौतुक केले जात आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील गावातील महिला मंडळाच्या बैठकीत महिलांना मंदिराच्या गाभा-यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे, असे मत गावातील आशालता आबासाहेब पांडे यांनी व्यक्त केले. मासिक पाळी हा काही विटाळ नाही तर केवळ ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्याने देवाला विटाळ होत नाही, तर माणसांनी तयार केलेली ही प्रथा आजपासून बंद करण्याचा निर्णय गावातील महिलांनी केला.

केवळ महिला मारुती मंदिरात गेल्या म्हणून विटाळ होतो ही प्रथा बंद करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आणि आज सकाळी सगळ््या महिला एकत्रित येऊन त्यांनी गावातील मारुती मंदिरामध्ये प्रवेश केला. आज सकाळी आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी इतर महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभा-यात प्रवेश केला आणि मारूतीच्या गाभा-यात जाऊन नारळ फोडले.

एका छोट्याशा गावातील महिलांनी एकत्रित येऊन कित्येक वर्षाची जुनी रूढी परंपरा झुगारून देऊन आज परिवर्तनाच्या दिशेने ख-या अर्थाने पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे या लढ्यामध्ये या महिलांच्या घरातील पुरुषसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात उभे राहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या