23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeबीडशिरुरजवळ भीषण अपघातात कुटुंबातील चौघे ठार

शिरुरजवळ भीषण अपघातात कुटुंबातील चौघे ठार

एकमत ऑनलाईन

बीड : पुणे-नगर रस्त्यावर कारेगाव (ता. शिरूर)जवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे. मृत चौघेही बीड जिल्ह्यातील डोमरी (ता. पाटोदा) येथील रहिवासी आहेत. भोंडवे कुटुंबीयांवर काळाने झडप घातल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.

सुदाम शंकर भोंडवे (६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी मृतांची नावे आहेत, तर अश्विन सुदाम भोंडवे (३५) हे जखमी झाले आहेत. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते.

शिरुर तालुक्यातील फलके मळ््याजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले.

मोटारीचा झाला चक्काचूर
अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून तिघांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिकी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोंडवे यांचे शैक्षणिक कार्यात योगदान
या अपघातात मृत्युमूखी पडलेले सुदाम शंकर भोंडवे हे डोमरी ता. पाटोदा, जि. बीड येथील सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक असून, त्यांचे व त्यांचा मुलगा अश्विन या अपघातातील जखमी हे देखील पुण्यातील शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. दोघांचेही शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या