बीड : बीड जिल्ह्यामध्ये ४० गावामध्ये आणि चार शहरात अॅन्टिजेन तपासणी सुरू आहे. त्यातच स्वॅबच्या तपासण्याही केल्या जात आहेत. गुरूवारी दुपारी आलेल्या अहवालात जिल्हाभरात आज ३०३ रूग्णांची भर पडली आहे. एकुण रूग्णांची संख्या ७८३७ वर पोहोचली आहे. गुरूवारी १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता २४५७ जण सध्या उपचार घेत आहेत. एकुण २०३ जणांचा आतापर्यंत मृत्युही झाला आहे.
बीड जिल्ह्यात शहरासह ग्रामिण भागात कोरोनाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामिण भागात बाधल्या गेला आहे. आतापर्यंत ७८३७ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये बीड तालुक्यात १९९८, आष्टी ४९२, पाटोदा १८०, शिरूर २६०, गेवराई ४७७, माजलगाव ७२०, वडवणी २२९, धारूर ३४९, केज ५८९, अंबाजोगाई ८८५, परळी १३५५ बाधित झाले आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ४८७४ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या २४५७ जण जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गुरूवारी १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत २०३ जणांचा मृत्यू झाला.
सोलापूर शहर-जिल्ह्यात चौदा कोरोनाबाधितांचा मृत्यू